महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मीसुद्धा स्कॉलरशिपचा लाभ घेतला, नंतर आरक्षणाचा लाभ सोडला - सुशीलकुमार शिंदे - Sushilkumar Shinde Big Statement

Sushilkumar Shinde : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून ठिकठिकाणी आंदोलनं आणि उपोषणं सुरू आहेत. आरक्षणावरून मराठा-ओबीसी वाद पेटलाय. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलंय. श्रीमंतांनी आरक्षण घेऊ नये, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय.

Sushilkumar Shinde News
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 5:34 PM IST

प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

सोलापूर Sushilkumar Shinde : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना म्हटलं होतं की, श्रीमंतांना आरक्षणाची गरज नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं आणि जातीय व्यवस्थेवर काम करायचं हे मला मान्य नाही. सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्याचा राज्याच्या राजकारणात परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मीसुद्धा आरक्षणाचा लाभ घेतला होता, आरक्षणामधून स्कॉलरशिप घेतली होती. ज्यावेळी मला त्याची गरज पडली नाही त्यानंतर मी आरक्षणाचा लाभ घेणं सोडलं होतं, असे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदें यांनी दिलं आहे.

आरक्षणाची मागणी करणाऱ्या श्रीमंतांना शिंदेंनी डिवचलं : तीन महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणीनं (Maratha Reservation) जोर धरलाय. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर पुन्हा एकदा दौरे सुरू केले आहेत. मनोज जरांगे पाटील हे ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी करत आहेत. जरांगे पाटलांच्या मागणीला ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र शब्दांत विरोध केलाय. राज्यात मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा वाद सुरू असताना, सुशीलकुमार शिंदे यांनी श्रीमंतांना आरक्षणाची गरज काय? असा सवाल उपस्थित करून ओबीसी आणि मराठा समाजातील श्रीमंतांना डिवचलंय.

सरकारनं शब्द दिला असेल तर आरक्षण द्यावं लागेल : सोलापूर शहरातील हिराचंद नेमचंद येथील अँपीथिएटरमध्ये शनिवारी सायंकाळी मराठी नाट्य परिषदेचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आरक्षणावर बोलताना शिंदेंनी सावध भूमिका मांडली. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला असेल तर द्यावं लागेल. शनिवारी दुपारी वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यानंतर शिंदे सायंकाळी मात्र सावध झाले होते. कारण मराठा समाजात आणि ओबीसी समाजात श्रीमंत लोक विरोध करतील असा अंदाज त्यांना आला होता. १९८० पर्यंत जातीचे विषय नव्हते, मात्र १९८५ पासून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि जातीय व्यवस्थेवर चालायचं असं सुरू आहे, हे मला मान्य नसल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. तर शिंदेंच्या या वक्तव्याचा विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -

  1. Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंच्या मतदारसंघातील गाठी भेटी स्वतःसाठी नव्हे तर मुलीसाठी... शिंदेंची स्पष्टोक्ती
  2. Sushilkumar Shinde : प्रणिती शिंदेंच्या तिकिटासाठी हायकमांडकडं विनंती करणार; सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य
  3. Sushilkumar Shinde On Award : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचे मौन; तीन वेळा म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details