सोलापूर - अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने 'सुशील करंडक 2020' या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहरात या स्पर्धेचे उदघाटन प्रसिध्द सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असे चार दिवस हुतात्मा स्मृती मंदिरात ही स्पर्धा असणार आहे.
सुशील करंडक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सिनेअभिनेते भरत जाधव.... हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भरत जाधव यांनी ही स्पर्धा नवकलारांसाठी एक चांगले व्यासपीठ असल्याचे म्हटले. तसेच या स्पर्धेत बाहेरगावच्या अनेक संस्था सहभाग घेतात. म्हणजे आपली ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. स्थानिक प्रेक्षकांनी या स्पर्धेला हाऊसफुल्ल उपस्थिती लावून कलाकारांना उत्तेजन द्यावे, तेव्हा कुठेतरी माझ्यासारखा एक हाऊसफुल्ल कलाकार निर्माण होतो. असे भरत जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हेही वाचा... 'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'
यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे, नियामक मंडळ सदस्य आनंद खरबस, परीक्षक मदन दंडगे, परीक्षक किर्ती मानेगावकर, विठ्ठल बडगंची, हेमा चिंचोळकर, सीमा यलगुलवार, भगवान रामपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.