महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनहित शेतकरी संघटनेचा अपक्ष उमेदवार गोडसे यांना पाठिंबा

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. अपक्ष उमेदवार शैलजा गोडसे यांनी महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके व भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यासमोर खडतर आव्हान निर्माण केले आहे.

जनहित शेतकरी संघटनेचा अपक्ष उमेदवार गोडसे यांना पाठिंबा

By

Published : Apr 6, 2021, 5:08 PM IST

पंढरपूर- पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीतील दोन्ही प्रस्थापित उमेदवार हे साखर सम्राट आहे. त्यांच्या कारखान्याचे उसाचे बिल अद्यापही थकीत आहे. अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्यासारख्या तळमळीने काम करणाऱ्या महिला उमेदवाराला शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शैला गोडसे यांनी विविध मुद्द्यांवर आंदोलने केली आहेत. यामुळे एक महिला उमेदवार म्हणून त्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी यावेळी सांगितले.

अपक्ष उमेदवार गोडसे यांचे भाजप व महाविकास आघाडी समोर आवाहन-

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. अपक्ष उमेदवार शैलजा गोडसे यांनी महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके व भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यासमोर खडतर आव्हान निर्माण केले आहे.

यामुळे शेतकरी संघटनेचा पाठिंबा-

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपूर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. जनहित शेतकरी संघटनेने मंगळवेढा येथील पाणी प्रश्नासंदर्भात आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची अजित पवार यांनी आंदोलनाची खिल्ली उडवली होती. त्याला उत्तर देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

ABOUT THE AUTHOR

...view details