सांगोला (सोलापूर) - सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे पाणी तालुक्यामधे आणण्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रतयत्नांना यश आले आहे. काल (गुरुवारी) बलवडी, नाझरे आणि चिनके येथे पाणी पूजन करून शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मेथवडे बंधाऱ्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची सूचना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
सांगोला तालुका हा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहे. तालुक्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी तालुक्याला कधीच मिळाले नव्हते. मात्र, आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी सांगोला तालुक्याला मिळाले. काल (गुरुवारी) आमदार पाटील यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे पाणी आटपाडी तलावातून 400 क्यूसेकने सोडण्यात आले. या पाण्याचा टेंभू लाभक्षेत्रातील बलवडी, वझरे, नाजरे, वाटंबर, वासुद, अकोला, कडलास, वाडेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे अशा सतरा गावांतील शेतीसाठी लाभ होणार आहे. पाटील यांनी लाभक्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी एकच दार टाकून मेथवडे बंधाऱ्यापर्यंत पाणी चांगल्या गतीने पोहोचले जाईल याची काळजी घेण्याची सूचना शाखा अभियंता मोरे आणि डेप्युटी इंजिनिअर केंगार यांना दिली.
टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी सांगोल्यात दाखल
सांगोला तालुका हा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहे. तालुक्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी तालुक्याला कधीच मिळाले नव्हते. मात्र, आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी सांगोला तालुक्याला मिळाले.
यावेळी विजय शिंदे, साहेबराव शिंदे, विकास मोहिते, तानाजी काका पाटील, पांडुरंग मिसाळ, विनायक मिसाळ, दादा वाघमोडे, मुकुंद पाटील, राजू खरात, राजेंद्र पाटील यांच्यासह बलवडी, नाजरा व चिणके येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उन्हाळी आवर्तनाचे टेंभूचे पाणी शेतीसाठी उपलब्ध झाल्याने 17 गावांतील सर्व शेतकऱ्यांमधे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
"टेंभू योजनेचे पाणी उन्हाळी आवर्तनाचे पाणी आजपर्यंत सांगोला तालुक्याला कधीच मिळाले नसल्याने तालुक्यातील उन्हाळी हंगामातील शेती पूर्णतः मागास राहिली होती. मात्र, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने उन्हाळी आवर्तनाच्या टेंभू व एन. आर. बी. सी. या दोन्ही योजनांचे उन्हाळी आवर्तन तालुक्याला पूर्ण क्षमतेने मिळाले असल्याने तालुक्यातील शेतीचा विकास होण्यास भरीव मदत मिळाली आहे. टेंभू योजनेच्या या पाण्याचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर करावा"
- तानाजी पाटील