पंढरपूर -भारतामध्ये दीड वर्षापासून कोरोनाने हाहाकार उडवला आहे. त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांमध्ये झालेला दिसून येतो. अकलूज येथील घोडेबाजार (Akluj Horse Market) एक वर्ष भरू शकला नाही. यंदाच्या वर्षी अकलूजमध्ये उच्च प्रतीचे जातीवंत घोडे महिन्याभरापासून दाखल झाले आहेत. या सर्वांमध्ये अतिशय रुबाबदार व 64 इंच पेक्षा जास्त उंची असलेला पांढराशुभ्र 'सुलतान' (Sultan Horse in Akluj Horse Market) हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यासाठी तब्बल 21 लाख रुपयांची बोलीही लावण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly District) जिल्ह्यातून सुलतान अकलूज (Sultan Horse Akluj) येथे आणण्यात आला असल्याची माहिती सुलतानचे मालक मोहम्मद शेख यांनी दिली आहे.
- बरेलीचा सुलतान ठरतोय आकर्षणाचा विषय -
अकलूजमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुलतान विषयी वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. सुलतान हा पंजाब या नामवंत जातीतील घोडा आहे. सुलतानची उंची सुमारे 65 इंच इतकी आहे. सुलतानची शारीरिक इष्टी घोड्यांच्या तुलनेत आकर्षक व रुबाबदार दिसून येते. सुलतानचे डोळे हे अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे त्याच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. सुलतान हा आपल्या पांढरेशुभ्र रंगामुळे सर्व अश्वांमधून उठून दिसत आहे. या सर्वामुळे त्याला 21 लाख रुपये बोली लावण्यात आली आहे. सुलतानच्या दिवसभराच्या खुराकासाठी पाचशे रुपयांच्या आसपास खर्च येतो.
- जातीवंत घोडे अकलूज बाजारांमध्ये दाखल -