सोलापूर- लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या डॉ. राहुल पवार याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या राहुलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. राहुलच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांनी केली आहे.
ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा कोरोनाने मृत्यू; राहुलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण - solapur corona news
राहुल ऊसतोड कामगारचा मुलगा होता. कित्येक पिढ्यांपासून घरात पहिला शासकीय नोकरी करणारा तो व्यक्ती होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या उपचारावर लाखो रुपयांचा खर्च झाला होता.
राहुलच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च
राहुल ऊसतोड कामगारचा मुलगा होता. कित्येक पिढ्यांपासून घरात पहिला शासकीय नोकरी करणारा तो व्यक्ती होता. पण नियतीला हे मान्य नव्हते. त्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या उपचारावर लाखो रुपयांचा खर्च झाला होता. राहुलच्या मृत्यूनंतर अद्याप महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठने किंवा राज्य सरकारने कोणतीही मदत जाहीर केली नाही. एवढचं नाही तर राहुलच्या कुटुंबीयांचे सांतवन करण्यसाठीही कोणी आले नाही. अखेर डॉ वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टरांनी राहुलच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता.