पंढरपूर -पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याच्या अडचणींमध्ये भर पडताना दिसत आहे. आर्थिक संकटात असलेल्या श्री विठ्ठल कारखान्याने पंधरा कोटीचा जीएसटी न भरल्यामुळे कारखान्याचे सर्व बँक खाते तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आली आहेत. त्यातच आता राज्य साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांची रक्कम थकलेल्या प्रकरणी आरआरसीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विठ्ठल कारखान्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाले आहेत. याचप्रकरणी जिल्ह्यातील सात कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांवर आरसीसी अंतर्गत कारवाईचे आदेश
राज्यातील 13 सहकारी कारखान्यांनी उसाचे गाळप करूनही शेतकऱ्यांची रक्कम थकविल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी आरआरसी अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यातील सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला मोठी झळ बसताना दिसत आहे. या कारखान्यांमध्ये श्री विठ्ठल साखर कारखान्याचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील सात कारखान्यांना आरआरसी अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा -बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
विठ्ठल सहकारी कारखान्याचे 39 कोटी रुपये थकीत
श्री विठ्ठल साखर कारखान्याने चालू हंगामामध्ये उस गाळप करूनही शेतकऱ्यांची ऊसाची रक्कम थकविल्या प्रकरणात आरआरसी अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. कारखान्याने 39 कोटी 76 रुपये थकवले आहेत. गाळप करूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे न दिल्यास आरआरसीची कारवाई होत असते. त्या संस्थेची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येते. यामुळे चेअरमन भगीरथ भालके यांच्यासमोर मोठ्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.