महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लांडोरला मिळाले जीवदान; कोरायजा आजारावर यशस्वी उपचार - सोलापूर कोरायजाग्रस्त लांडोर

14 जूनला कोरायजा या संसर्गजन्य आजाराने संक्रमित लांडोर दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजुर गावी आढळून आली होती. सोलापूर वन विभाग आणि काही वन्यजीव प्रेमींनी तिला अॅनिमल राहत संस्थेकडे उपचारासाठी दाखल केले. या लांडोरने पाच दिवस वैद्यकीय उपचारांना पुरेपूर प्रतिसाद दिला.

Peahen
लांडोर

By

Published : Jun 18, 2020, 8:56 PM IST

Updated : Jun 18, 2020, 9:50 PM IST

सोलापूर - वन विभाग आणि अ‌ॅनिमल राहत संस्थेने एका आजारी लांडोरवर यशस्वी उपचार करून जीवनदान दिले. कोरायजा या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असलेल्या या लांडोरने अवघ्या पाच दिवसांत आपल्या नैसर्गिक अधिवासात भरारी घेतली.

लांडोरला मिळाले जीवदान

14 जूनला कोरायजा या संसर्गजन्य आजाराने संक्रमित लांडोर दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजुर गावी आढळून आली होती. सोलापूर वन विभाग आणि काही वन्यजीव प्रेमींनी तिला अॅनिमल राहत संस्थेकडे उपचारासाठी दाखल केले. या लांडोरने पाच दिवस वैद्यकीय उपचारांना पुरेपूर प्रतिसाद दिला. त्यामुळे अवघ्या पाच दिवसात प्राणघातक कोरायजा आजारातून ती लांडोर बरी झाली. आज तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यावेळी तिने घेतलेली भरारी बघून उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले.

यावेळी सोलापूर वन विभागाचे वनरक्षक बापु भोई, वन्यजीव प्रेमी माल्लिकार्जून धुळखे़डे, प्रवीण जेऊरे, सुनील अरळ्ळीकट्टी, मुकुंद शेटे, सिधबस कोणदे, राजुर गावचे सरपंच सिध्दाराम देवकते आणि विहीर मालक संजय बिराजदार उपस्थित होते.

Last Updated : Jun 18, 2020, 9:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details