महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार - सुभाष देशमुख - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार

सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, त्यामध्ये खरीप 2019 हंगामामधील पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये सुधारणा करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांवरील कर्ज माफ होणार असल्याचे पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले.

पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख

By

Published : Aug 29, 2019, 1:38 PM IST

सोलापूर - जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकावरील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये खरीप 2019 या हंगामात घेतलेले कर्ज माफ करण्याचा उल्लेख होता. आता त्याऐवजी या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ होणार असल्याची माहिती पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, त्यामध्ये खरीप 2019 हंगामामधील पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये सुधारणा करून प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँक, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर राज्य शासन पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम बँकांना देणार आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नाही. मात्र, पुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वसाधारण नुकसान भरपाईच्या ३ पट भरपाई देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details