सोलापूर - राज्यातला दुष्काळ हटावा तसेच पुरग्रस्तांना बळ मिळावं, अशी प्रार्थना राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विघ्नहर्त्याला केली आहे. सुभाष देशमुखांनी आपल्या होडगी रोडवर असलेल्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्यातला दुष्काळ हटू दे; पूरग्रस्तांना बळ मिळू दे, सहकारमंत्र्यांची बाप्पा चरणी प्रार्थना - सुभाष देशमुखांची विघ्नहर्त्याला प्रार्थना
राज्यातला दुष्काळ हटावा तसेच पुरग्रस्तांना बळ मिळावं अशी प्रार्थना राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विघ्नहर्त्याला केली आहे.
सहकारमंत्र्यांची बाप्पा चरणी प्रार्थना
सुभाष देशमुख यांचा मोठा मुलगा मनीष देशमुख यांनी सपत्नीक बाप्पाची पूजा केली. यावेळी स्वतः सुभाष देशमुख पत्नी स्मिता यांच्यासह परिवारातील अन्य सदस्यही उपस्थित होते. सांगलीचे पालकमंत्री असलेल्या सुभाष देशमुखांनी पूरग्रस्तांना बळ मिळो, तसेच दुष्काळी भागात पाऊस पडावा अशी प्रार्थना बाप्पा चरणी केली.