सोलापूर-शहरातील प्रत्येक वार्डात ओपीडी सुरु करण्याची मागणी माजी मंत्री व आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लोकांच्या आरोग्याची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक वार्डात ओपीडी सुरु करण्याची मागणी करण्यात आलीय.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी सोलापूरमध्ये येऊन आढावा बैठक घेतली. सोलापूर शहरातील डॉक्टरांची बैठक झाल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीमध्ये सुभाष देशमुख यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे विविध मागण्या करण्यात आल्या.