महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपघातात पोलीस उपनिरीक्षक ठार; पत्नीसह पाच जण जखमी

गणेश बलभीम जरांडे हे नवी मुंबई येथे पोलीस मुख्यालयात नोकरीला होते. महिंद्रा मॅक्स (एम एच २५ आर ००८१) या वाहन चालकांविरोधात बेजबाबदारपणे गाडी चालून मुत्यू कारणीभूत ठरल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक व त्याचे कुटुंब
पोलीस उपनिरीक्षक व त्याचे कुटुंब

By

Published : Jan 22, 2021, 10:25 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर-दिघची रोडवर रात्री सुमारास कटफळ (ता. सांगोला) वस्तीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने चाललेल्या महिंद्रा मॅक्सने मारुती सुझुकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात नवी मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक ठार झाले आहेत. गणेश भीमराव जरांडे (वय ३२ रा. कळस ता. इंदापूर जि.पुणे) असे मृत्यू पावलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.


अपघातात पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी, बहीण, मेहुणे आणि लहान मुलेही जखमी झाले आहेत. सोनाली गणेश जरांडे (वय २५), समर्थ गणेश जरांडे (वय ३, रा. कळस, ता. इंदापूर ), नानासाहेब सखाराम गाढवे (४२), अर्चना नानासाहेब गाढवे (३२), संग्राम नानासाहेब गाढवे (१८) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

अपघाताचे भयंकर दृश्य


चालकांविरोधात गुन्हा दाखल
गणेश बलभीम जरांडे हे नवी मुंबई येथे पोलीस मुख्यालयात नोकरीला होते. महिंद्रा मॅक्स (एम एच २५ आर ००८१) या वाहन चालकांविरोधात बेजबाबदारपणे गाडी चालून मुत्यू कारणीभूत ठरल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पत्नी, बहीण, मेहुणे, लहान मुलांना अकलूज येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. सीताराम उत्तम खरात (रा. शेरेवाडी ता. सांगोला) यांनी पिकअप चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details