सोलापूर- येथील मोहोळ तालुक्यातील देगावमध्ये रुपाली पवार या विद्यार्थिनीने बँकेने कर्ज दिले नाही म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बॅंकेच्या अधिकाऱ्यांवर गून्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे तसे निवेदन देण्यात आले आहे.
विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी - mohol
मोहोळ तालूक्यातील देगावातील रुपाली पवार या विद्यार्थिनीने बँकेने कर्ज दिले नाही म्हणुन आत्महत्या केली होती. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बॅंकेच्या अधिकाऱ्यांवर गून्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने कऱण्यात आली आहे.
देगाव येथील शेतकऱ्याची मूलगी रुपाली पवार या विद्यार्थिनीने फी भरण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणाने आत्महत्या केली होती. रुपाली पवार या विद्यार्थीने स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नरखेड शाखेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र बॅंकेने या विद्यार्थिनीच्या कर्जाच्या अर्जाकडे लक्ष न देता या विद्यार्थिनींला कर्ज दिले नाही. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज दिले नसल्यामुळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. त्यामूळे रुपाली पवार या विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरून संबंधिक स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गून्हा दाखल करावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
शैक्षणिक कर्ज मिळावे यासाठी रुपाली पवार व तिचे वडील हे स्टेट बॅंकेच्या नरखेड शाखेत गेले होते. तेथील अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिले. तूम्ही सोलापूरातील बाळी वेस येथील मूख्य शाखेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांना भेटा असा सल्ला दिला. आपल्या पोरीच्या शिक्षणासाठी कर्ज मिळेल या आशेपोटी रुपालीचे वडील बाळीवेस येथील मुख्य शाखेतही जाऊन आले. मात्र कर्ज मिळू शकत नाही असे कळल्यामुळे रुपाली व तिचे वडील हताश झाले होते. शिक्षणासाठी कर्ज मिळत नाही. वडील आपल्या शिक्षणाची फीस भरू शकत नाही. या नैराश्यातून रुपाली पवार हिने आत्महत्या केली. त्यामुळे या आत्महत्येस बॅंकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गून्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.