सोलापूर -एमआयटी रेल्वे इंजीनिअरिंग कॉलेज ऑफ बार्शीच्या प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी द्यावी यासाठी हे आंदोलन केले जात आहे.
शिवजयंती साजरी करण्याची परवानगी द्या, विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात आंदोलन
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय पद्धतीने साजरी करण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन प्राचार्यांना दिले. मात्र, त्यांनी मागणी फेटाळून लावली. जोपर्यंत परवानगी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय पद्धतीने साजरी करण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन प्राचार्यांना दिले. मात्र, त्यांनी मागणी फेटाळून लावली. जोपर्यंत परवानगी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख केला जात असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांनी केला.
दरम्यान, याप्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा अंतर्गत विषय असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.