सोलापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहर प्रशासनानें आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी शहर आणि ग्रामीण पोलीस दल करत आहे. विनाकारण बाहेर आणि मोकाट फिरणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचे वाहन जप्त केले जात आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. झपाट्याने वाढ होत असलेल्या कोरोना विषाणूचा कहर कमी करण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन सुरू झाले आहे. एकीकडे कोरोना महामारीने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे नागरिकांचा हलगर्जीपणा देखील यास कारणीभूत ठरत आहे. शासन ही महामारी रोखण्यासाठी सोलापुरात विविध उपाययोजना करत आहे. 5 एप्रिल पासून सोलापुरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. तर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत दुचाकी वर डबल सीट फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली-