सोलापूर - मुंबई-पुण्यावरून गावी परतणाऱ्या लोकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाची लागण होत आहे. शहरांमधून गावाकडे येणारे हे लोंढे थांबवावेत, अशी मागणी पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी केली आहे.
मुंबई-पुण्यावरून गावाकडे येणारे लोंढे थांबवा, भारत भालके यांची सरकारकडे मागणी - पंढरपूर कोरोना घडामोडी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यावरून येणारे लोंढे थांबवा, अशी मागणी भालके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. गेली अडीच महिने कोरोनामुक्त असणाऱ्या पंढरपुरात एकाच दिवसात पाच कोरोनाबाधित रुग्ण सापडले.
कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. मागील दोन महिने एकही कोरोनाचा रुग्ण नसलेल्या पंढरपुरात पाच कोरोनाबाधित सापडले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यावरून येणारे लोंढे थांबवा, अशी मागणी भालके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. गेली अडीच महिने कोरोनामुक्त असणाऱ्या पंढरपुरात एकाच दिवसात पाच कोरोनाबाधित रुग्ण सापडले. पंढरपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या ६ झाली आहे. या सहा पैकी पाच रुग्ण हे मुंबई तर एक रुग्ण पुण्यावरून आलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सराकारने हे येणारे लोंढे थांबवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.