पंढरपूर -गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अचानक वेळापूर (ता. माळशिरस) येथील पोलीस ठाण्यास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. तसेच पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवर कारवाई करून या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्याचे निर्देश दिले. राज्यमंत्री देसाई यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या विविध भागांची पाहणी केली. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विविध तक्रारी व गंभीर, गुन्हे याबाबत माहिती घेतली.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची वेळापूर पोलीस ठाण्यास भेट - Velapur Police station
राज्यमंत्री देसाई यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या विविध भागांची पाहणी केली. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विविध तक्रारी व गंभीर, गुन्हे याबाबत माहिती घेतली.
राज्यमंत्री देसाई यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराची तक्रार काय आहे, याबाबत माहिती घेतली व तक्रारदारास रितसर तक्रार देण्यास सांगून, तक्रारीबाबत पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तसेच त्यांनी उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची व कर्मचारी यांची विचारपूस करून पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तात्काळ तपास करून दोषींवर आवश्यक ती कारवाई वेळेत करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.