पंढरपूर -राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मानाच्या 10 पालकांना एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला घेऊन जाण्याबाबत आज निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी सोहळा हा 2021 च्या नियोजनाला राज्य मंत्रिमंडळात मान्यता दिली. महाविकास आघाडी सरकारने मानाच्या दहा पालख्यांना बसच्या माध्यमांने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. यामध्ये सुमारे चारशे वारकरी संप्रदायामधील महाराज मंडळींचा समावेश असणार आहे. एसटी बसने मानाच्या पालख्या वाखरीपर्यंत जाणार आहे. त्यानंतर नियमानुसार दीड किलोमीटरचे अंतर वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. याबाबतची नियमावलीचा आदेशात काढण्यात आला.
पायी वारी नसल्याने वारकरी संप्रदायकडून नाराजी व्यक्त -
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे आषाढी एकादशी सोहळा प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात आला होता. त्यावेळीही मानाच्या पालख्या एसटीच्या माध्यमातून पंढरपुरात आणण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पायीवारी दिंडीची परवानगी घ्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदाय, महाराज मंडळी, भारतीय जनता पार्टी तसेच तसेच इतर संघटनांकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती. मात्र, पायीवारी दिंडी दरम्यान वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर वारीत सहभागी होतील. यामुळे पांडुरंगाची होणारी आषाढी एकादशी सोहळा प्रतीकात्मक करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या पायी दिंडी संदर्भात महाराज मंडळींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाखरी येथून पायी वारी करण्याची परवानगी -