महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vitthal Temple : पांडुरंगाचे चरणस्पर्श दर्शन सुरू करा - वारकरी भाविकांची मागणी - पंढरपूर गहिनीनाथ महाराज औसेकर

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्शाने सुरू करण्याची मागणी वारकरी संप्रदायातील ( Warkari Sampraday ) महाराज मंडळी व भाविक भक्तांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थिती श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन बंद आहे. ( Shri Vitthal Rukmini Darshan ) श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शनाची सोय विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आली आहे. त्यासंबंधित श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदस्यांकडून विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

Start Charansparsh Darshan of Shri Vitthal demand by Warkari Bhavik pandharpur
पांडुरंगाचे चरणस्पर्श दर्शन सुरू करा - वारकरी भाविकांची मागणी

By

Published : Mar 27, 2022, 3:39 PM IST

पंढरपूर -श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्शाने सुरू करण्याची मागणी वारकरी संप्रदायातील ( Warkari Sampraday ) महाराज मंडळी व भाविक भक्तांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थिती श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन बंद आहे. ( Shri Vitthal Rukmini Darshan ) श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शनाची सोय विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आली आहे. त्यासंबंधित श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदस्यांकडून विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्या संदर्भात राज्य शासनाकडे मागणी करण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज यांनी दिली.

याबाबत बोलताना विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर बोलताना

हेही वाचा -Accident in Amravati : ट्रक कारच्या धडकेत पाच ठार; नांदगावपेठ रिंग रोडवर दुर्घटना

विठोरायाच्या चरणदर्शन सुरू करावे या मागणी साठी वारकरी शिक्षण संस्थेमधील बाल वारकर्‍यासह विविध वारकरी प्रतिनीधी यांच्या वतीने संत नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले या वेळी जोगदंड महाराज यांच्या सह अनेक वारकर्‍यांनी विठ्ठल रूक्मिणी ला भजन म्हणत प्रदक्षणा पुर्ण केली तसेच संत नामदेव पायरी येथे ठिय्या आंदोलन करून अभंग गायन करण्यात आले. या वेळी सर्व वारकर्‍यानी ‘‘दर्शन द्या पंाडुरंगा दर्शन द्या’’ अशी प्रार्थना करून संत नामदेव पायरी येथे विठुरायाची आरतीदेखील केली.

ABOUT THE AUTHOR

...view details