सोलापूर -राज्यातील 1 लाख 10 हजार एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ऐन दिवाळीत वेतनापासून वंचित राहिल्याने सण कसा साजरा करायचा, असा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे सोलापूर विभागातील ड्रायव्हर, कंडकटर, मेकॅनिक, क्लार्कसह सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंब राहत्या घरी आक्रोश आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहेत.
विधान परिषदेची निवडणूक असल्याने सोलापूर जिल्ह्यात व शहरात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयासमोर आंदोलन किंवा एसटी बंदची घोषणा किंवा निवेदन कार्यक्रम घेण्यात आले नाही. आपल्या कुटुंबासह राहत्या घरी आक्रोश व्यक्त केला असल्याची माहिती सोलापूर डिव्हिजनमधील एसटी युनियन कर्मचाऱ्यांनी दिली.