सोलापूर - पंढरपूर रनर्स असोसिएशनच्या बॅनरखाली 'रनिंग इज माय लाइफ' हे ब्रीदवाक्य घेवून पंढरपूरच्या काही हौशी तरुणांनी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. यात दहा किलोमीटर आणि साडेतीन किलोमीटर अशा दोन गटात स्पर्धा विभागण्यात आली होती. पंढरपूरचे उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेची सुरुवात झाली.
कडाक्याच्या थंडीत धावले पंढरपूरकर हेही वाचा-निर्भया प्रकरण : फाशीच्या स्थगितीविरोधात केंद्राच्या याचिकेवरील निकाल ठेवला राखून..
सकाळी सहाच्या दरम्यान या स्पर्धेची सुरुवात झाली. गेल्या पंधरा दिवसापासून या मॅरेथॉनची उत्सुकता नागरिकांना लागली होती. यात जिल्ह्यातील धावपटूंनी सहभाग नोंदवला. सुरुवातील योगासने करण्यात आली. सर्वच गटातील नागरिकांनी यात सहभाग घेतला होता.
दहा किलोमीटर पुरुष गटात रिलेश मुंगले याने ३३ मिनिटे १४ सेकंदात पहिला क्रमांक मिळवला. तर महिलांच्या गटात दहा किलोमीटरमध्ये श्रध्दा हाके हिने ३९ मिनिटे ३३ सेकंदात पहिला क्रमांक पटकावला. पहिला क्रमांक पटकावलेल्या दोन्ही धावपटूंना आमदार भारत भालके यांच्या हस्ते पदक देवून गौरवण्यात आले.