महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडले; सोलापुरातील घटना - solapur police accident death

हा अपघात आज (रविवारी) दुपारी 4 ते 4.30 दरम्यान वरवडे टोल नाक्याजवळ झाला. यात भरधाव टेम्पो चालकाने सागर चौबे यांना चिरडले. अपघातानंतर टेम्पो चालकाला पकडण्यात आले आहे.

sagar chaube
सागर औदुंबर चौबे

By

Published : Dec 6, 2020, 7:25 PM IST

सोलापूर -येथील सोलापूर-पुणे महामार्गावर महामार्ग पोलिसाला आयशर टेम्पो चालकाने धडक दिली. या अपघातात सागर औदुंबर चौबे (वय-35, रा. बार्शी, नियुक्त मोडनिंब महामार्ग पोलीस पॉईंट) यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

हा अपघात आज (रविवारी) दुपारी 4 ते 4.30 दरम्यान वरवडे टोल नाक्याजवळ झाला. अपघातानंतर टेम्पो चालकाला पकडण्यात आले आहे. टेम्भुर्णी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा -एकाच गावातील ३००हून अधिक लोक अचानक झाले बेशुद्ध; सुमारे ५० गंभीर..

सागर चौबे मोडनिंब पॉईंटला तर विशाल चौबे सावळेश्वर पॉईंटवर नियुक्त -

बार्शी येथील दोघे भाऊ ग्रामीण पोलीस दलात भरती झाले होते. मृत सागर चौबे यांचा भाऊ विशाल चौबे हे सावळेश्वर महामार्ग पोलीस पॉईंटवर नियुक्त आहे. दरम्यान, या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details