महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरातील 981 परप्रांतीय तामिळनाडूला रवाना, पंढरपूर ते तिरूचिरापल्ली धावली स्पेशल रेल्वे

सोलापूर जिल्ह्यात विविध भागात अडकून असलेल्या तामिळनाडू येथील मजूर, विद्यार्थी यांना पंढरपूरात एकत्र आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घेऊन ही रेल्वे रवाना झाली.

Solapur
सोलापूर ते तामिळनाडू रेल्वे रवाना

By

Published : May 9, 2020, 5:46 PM IST

सोलापूर- लॉकडाऊनमुळे सोलापुरात अडकलेल्या कामगार मजूर व विद्यार्थ्यांना घेऊन विशेष ट्रेन पंढरपूरवरून तामिळनाडूच्या दिशेने रवाना झाली. आज दुपारी ही रेल्वे पंढरपूर रेल्वे स्थानकवरून तिरूचिरापल्ली येथे जाण्यासाठी निघाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सोलापुरात अडकलेल्या 981 जणांना घेऊन ही रेल्वे आज दुपारी मार्गस्थ झाली. या रेल्वेला 22 डबे आहेत. सोलापूर जिल्ह्यात विविध भागात अडकून असलेल्या तामिळनाडू येथील मजूर, विद्यार्थी यांना पंढरपूरात एकत्र आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घेऊन ही रेल्वे रवाना झाली.

यामधील प्रत्येक प्रवाश्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. प्रत्येक डब्यामध्ये 54 प्रवाशांची सोय करण्यात आली आहे. तर प्रत्येकी प्रवाशांकडून रेल्वेने 560 रूपये तिकीट घेतले आहे. हे सर्व लोक मागील 48 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेले होते. ते आता त्यांच्या गावाकडे निघाले आहेत. रविवारी दूपारी 2 वाजता ही रेल्वे तिरूचिरापल्ली येथे पोहचणार आहे. त्या ठिकाणी पोहचल्यावर या प्रवाश्यांची त्यांच्या-त्यांच्या गावात विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details