सोलापूर- करमाळा तालुक्यातील केम गावातील पहिली मुलगी भारतीय सैन्यात भरती झाली आहे. सोनल राजेंद्र तळेकर, असे या मुलीचे नाव आहे. सोनलची केंद्रीय राखीव दलात निवड झाली असून सोनल ही केम गावामधून सैन्यात भरती होणारी पहिली मुलगी आहे. त्यामुळे पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे.
सोनल ही पदवीधर आहे. तिचे दहावीपर्यतचे शिक्षण उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये झाले आहे. सोनल जिद्दीने केंद्रीय राखीव दलात भरती झाली आहे. तर सोनलच्या वडिलांचे शिक्षण फक्त तिसरीपर्यंत झाले आहे. ते शेती करतात, असे असतानाही मुलगा व मुलगी यात भेदभाव न करता त्यांनी सोनलचे शिक्षण पूर्ण केले. तर सोनलनेही धाडसी निर्णय घेऊन देशसेवा करण्याचे ठरऊन केंद्रीय सैन्य दलात भरती होऊन आमच्या कुटूंबाची मान उंचावली असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले आहे.
हेही वाचा -Women's Day : विमलताईंच्या जिद्दीला सलाम.. तीन मुलींना केले उच्चशिक्षीत