महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूरच्या दोन्ही देशमुखांची मुले सांभाळतायेत वडिलांच्या प्रचाराची धूरा - assembly elections solapur

सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा मनिष देशमुख हे वडिलांच्या प्रचाराची धूरा सांभाळत आहेत. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, विजयकुमार देशमुख सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

दोन्ही देशमुखांची मुलं सांभाळतायेत वडिलांच्या प्रचाराची धूरा

By

Published : Oct 11, 2019, 12:20 PM IST

सोलापूर - भाजपचे मंत्री असलेल्या दोन्ही देशमुखांची मुले ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात सक्रीय असल्याचे दिसत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा मनिष देशमुख हे वडिलांच्या प्रचाराची धूरा सांभाळत आहेत.

हेही वाचा -माझे आणि जयवंतराव जगताप यांचे लव्ह मॅरेज - संजय शिंदे

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, विजयकुमार देशमुख सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विजयकुमार देशमुख यांचा मुलगा व्यवसायाने डॉक्टर असून ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवकही आहेत. तर, विदेशात शिकलेला सुभाष देशमुख यांचा मुलगा मनिष मागील एका वर्षापासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्य करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details