सोलापूर- सासूबाई या महापौर पदासाठी निवडणूकीला उभ्या असताना जावयांने सासूला मतदान करण्याऐवजी तटस्थ राहणे पसंत केले. राजकारणात नाते संबंध वेगळे आणि राजकारण वेगळे याचाच प्रत्यय सोलापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीवेळी पाहायला मिळाला. .
'सासू'च्या महापौर निवडीवेळी नगरसेवक 'जावई' तटस्थ
आज सोलापूर महानगर पालिकेतील महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची निवड झाली. यावेळी त्यांचे जावई शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी पक्ष निर्णयामुळे तटस्थ राहणे पसंत केले.
देवेंद्र कोठे
महापौर पदासाठी भाजपकडून श्रीकांचना यन्नम यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक लागल्यानंतर मतदान प्रक्रिया होत असताना श्रीकांचना यन्नम यांचे जावई नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी मात्र सासूला मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
हेही वाचा - सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम तर उपमहापौरपदी राजेश काळे यांची निवड