महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Legal Action Against Kiran Lohar : शिक्षणाधिकारी किरण लोहारवर कारवाई करण्याबाबत उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविणार - किरण लोहार यांना लाच घेताना अटक

लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारवर (action against Education Officer Kiran Lohar) कारवाईची कुऱ्हाड पडणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांवर अँटी करप्शन विभाग सोलापूर युनिटने 25 हजार रुपयांची लाच घेताना (Kiran Lohar bribe taking case) रंगेहात कारवाई केली आहे. (Kiran Lohar arrested for accepting bribe), (Solapur ZP CEO will send proposal to Deputy Director)

Kiran Lohar bribe taking case
लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार

By

Published : Nov 2, 2022, 6:39 PM IST

सोलापूर : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारवर (action against Education Officer Kiran Lohar) कारवाईची कुऱ्हाड पडणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांवर अँटी करप्शन विभाग सोलापूर युनिटने 25 हजार रुपयांची लाच घेताना (Kiran Lohar bribe taking case) रंगेहात कारवाई केली आहे. यामुळे शिक्षण खात्याला काळिमा फासली आहे. त्यावर कारवाईसाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, किरण लोहार यांच्यावर कारवाईसाठी (Kiran Lohar arrested for accepting bribe) शिक्षण उपसंचालक यांकडे प्रस्ताव पाठविण्यात (Solapur ZP CEO will send proposal to Deputy Director) आला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते-उत्तर सोलापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेला 5 वी ते 8 वर्ग वाढ व पटसंख्या वाढची मान्यता देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी मागितली होती.तडजोडी अंती 25 हजार रुपये ठरले होते.31 ऑक्टोबर रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास 25 हजार रुपये घेताना शिक्षण अधिकारी किरण लोहार रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकले.मंगळवारी दुपारी किरण लोहार यांना कोर्टात हजर केले असता 3 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

पदभार उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांकडे-सोलापूर जिल्ह्याचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांवर कारवाई झाल्याने शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे.डीसले गुरुजीना भिडणारे शिक्षण अधिकारी म्हणू म्हणून त्यांची सोलापुरात ओळख झाली होती.पण सध्या ते अँटी करप्शनच्या कोठडीत आहेत. मुख्य अधिकारीच गेल्याने शिक्षण खात्याची जबाबदारी उप शिक्षणाधिकारी संजय जावीर यांकडे दिला असल्याची माहिती जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details