सोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या बैठकीला निघालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून कार चालक भीमाशंकर कोळी, डॉ. राजेंद्र भारूड आणि सुरक्षा रक्षक कोळी यांना कोणतीही इजा झालेली नाही.
कार अपघातात थोडक्यात बचावले सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारूड - मुख्य कार्यकारी अधिकारी
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आषाढी यात्रेसाठी पुण्यात आज बैठक बोलावली होती, त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड निघाले होते. यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
सोलापूर-पुणे महामार्गावर कुरकुंभ जवळ भारुड यांच्या टाटा सफारी गाडीला ट्रकने पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातातून भारुड थोडक्यात बचावले. ते सुखरूप असल्याचा निरोप मिळाल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आषाढी यात्रेसाठी पुण्यात आज बैठक बोलावली होती, त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारुड निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. मात्र, या अपघातानंतर भारुड यांनी दुसऱ्या गाडीची तात्काळ व्यवस्था करून ते पुण्याला रवाना झाले.