सोलापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे, पण आता भाजपच्या गोटात असलेल्या मोहिते-पाटील यांच्या सदस्यांच्या निलंबनाला उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध मोहिते-पाटील असा राजकीय रंग येत आहे. त्यामुळे मोहित्यांचे सदस्य निलंबित करण्यासाठी राष्ट्रवादीने हा डाव सुरू केल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. तर पक्ष म्हणून ही कार्यवाही करत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बळीराम साठे यांनी म्हटले.
हेही वाचा... अजित पवार हे आमच्या सरकारची 'स्टेपनी' - संजय राऊत
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मातब्बर असणाऱ्या मोहिते-पाटील गटाने गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक संख्याबळ मिळवून दिले होते. सर्वाधिक जागा माळशिरसमध्ये आणल्या होत्या. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत यांनी राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या आपल्या सदस्यांचे संख्याबळ भाजपच्या पाठीशी उभे केले.