सोलापूर - गांधी परिवाराला विशेष सुरक्षा व्यवस्था पुन्हा प्रदान करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
गांधी परिवाराला विशेष सूरक्षा प्रदान करा; सोलापूर युवक कॉंग्रेसची मागणी - solapur youth congress
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना दिलेली सुरक्षा या केंद्रातील मोदी सरकारने काढून घेतली आहे. ती परत प्रदान करण्यासाठी सोलापूर युवक कॉंग्रेसने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने राजकीय हेतूने प्रेरित होऊन गांधी परिवाराची विशेष सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. असा आरोप सोलापूर कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करत गांधी परिवाराला पुन्हा सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी, या मागणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर काँग्रेस संघटनेच्या वतीने युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
हेही वाचा -सरकार पाच वर्ष टिकावं म्हणूनच बैठका सुरू - बाळासाहेब थोरात