सोलापूर- कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या शहरातील मजुरांसह मुक्या जनावरांचे आतोनात हाल होत आहेत. माणसांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी अनेकांनी घेतली. मात्र मुक्या गुरांचा कोणीही वाली नाही. अशा मुक्या जीवासाठी सोलापूरातील काही तरुणांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ते तरुण शहरातील मुक्या जनावरांच्या चारा पाण्याची सोय करत आहेत.
सद्या लॉकडाऊनमुळे शहरात चारा मिळणे कठीण बनले आहे. अशात भटके जनावरे कॅरीबॅग खाताना तरुणांच्या नजरेस दिसून आले. तेव्हा त्यांनी जनावराची होणारी परवड ओळखून त्या जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय केली. शहरातील रुपाभवानी मंदीर, कुंभार वेस, बाळीवेस, निला नगर, सम्राट चौक, आंबेडकर उद्यान, कडबा गल्ली, हनुमान नगर, उदय मुखी चौक या परिसरातील भटक्या जनावरांना चारा पाणी करण्याचे काम सोलापुरातील तरुणाई करत आहे.