महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहा दिवसांच्या लॉकडऊननंतर तीन टप्प्यात सोलापूर होणार 'अनलॉक'

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापूर शहरासह आसपासच्या 30 गावांत मागील दहा दिवस टाळेबंदी करण्यात आली होती. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून सोलापूर शहरात तीन टप्प्यात अनलॉक करण्यत येणार आहे.

By

Published : Jul 27, 2020, 2:01 PM IST

solapur
solapur

सोलापूर- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर शहरासह आजूबाजूच्या 30 गावांत गेल्या दहा दिवसांपासून (16 जुलै ते 26 जुलै) लॉकडाऊन घोषित केले होते. दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारपासून (दि. 27 जुलै) सोलापुरात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार असून आज केवळ अत्यावश्यक सेवांसह दूध, किराणा दुकाने, भाजीपाला सुरू होतील.

बार्शी, मोहोळ आणि अक्कलकोट या तालुक्यात मात्र 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि वाढते मृत्यू यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ, औषधे, रुग्णालये, पेट्रोलपंप सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत सुरू राहणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात मंगळवारी (दि. 28 जुलै) शहरातील बाजारेपठा पूर्वीच्या नियमाप्रमाणे सुरू राहणार आहेत. मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स वगळून मार्केटमधील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर तिसर्‍या टप्प्यात म्हणजेच बुधवारी (दि. 29 जुलै) मार्केट यार्ड सुरू होणार आहे.

मंगळवारपासून शहरातील बाजारपेठा पूर्वीच्या नियमानुसार सुरू होणार आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंदच राहणार आहे. भाजीपाला विक्री केंद्रावर एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून शहरातील विविध आठ ठिकाणी खुल्या मैदानात बुधावरपर्यंत भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केले आहे.

शहरात बुधवारपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत विजापूर रस्त्यावरील एसआरपीएफ कॅम्प परिसरातील मैदान, पुणे रोडवरील पुणे जकात नाका परिसर, तुळजापूर रोड मश्रृम गणपती मंदिरासमोरील मैदान, होटगी रोड सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखान्याजवळील मोकळे मैदान, अक्कलकोट रोड गॅस पंप परिसर, हैदराबाद रोड येथील मंत्री चंडक अंगण मोकळी जागा, देगाव रोड येथील सीएनएस हॉस्पिटल शेजारील मैदानात भाजीपाला बाजार भरविण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत.

हे नियम लागू असतील

पूर्वीप्रमाणे हॉटेल बंदच राहणार आहे. मात्र हॉटेलची होम डिलेव्हरी सेवा सुरू राहणार आहे. वस्तूंची दुरुस्ती घरपोच सेवा पध्दतीने सुरू राहणार आहे. औद्योगिक घटक शर्ती व अटीनुसार सुरू राहणार आहेत. महापालिकेने पूर्वी परवानगी दिलेले आणि पूर्वी सुरू केलेली बांधकामे सुरू राहतील. शासकीय कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर ठिकाणी 15 टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details