महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Solapur University : सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा अचानकपणे रद्द, विद्यार्थ्यांत गोंधळाची परिस्थिती - महाविद्यालया बाहेर घोषणाबाजी

सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा अचानकपणे रद्द झाल्याने सोलापूर शहरातील हजारो विद्यार्थ्यांना परत जावे लागले. २ फेब्रुवारी, गुरुवारी सकाळी ९ वाजता परीक्षार्थी परीक्षा हॉलमध्ये हजर होणार होते. पण परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या तयारीत असताना अचानकपणे सकाळी ८.३० वाजता मोबाईलवर परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आला. यामुळे विद्यार्थ्यांची धांदल उडाली आहे.

Solapur University
सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा अचानकपणे रद्द,

By

Published : Feb 2, 2023, 2:27 PM IST

सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा अचानकपणे रद्द

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा अचानकपणे रद्द झाल्याने सोलापूर शहरातील हजारो विद्यार्थ्यांना परत जावे लागले. कायद्याची पदवी घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने माहिती देताना सांगितले की,आज गुरुवारी सकाळी 9 वाजता परीक्षा हॉल मध्ये हजर व्हायचे होते,परिक्षेच्या जाण्याच्या तयारीत असताना,अचानकपणे सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर मेसेज आला की, परीक्षा रद्द झाल्या आहेत. हा मेसेज चुकीचा असू शकतो,असा अंदाज लावत महाविद्यालयात आलो असता, परीक्षा रद्द झाल्याबाबत सविस्तर माहिती महाविद्यालयाने दिली.

सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परिक्षा रद्द: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार घातल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.सोलापूर शहरातील वालचंद आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालया बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घोषणाबाजी करत, विद्यार्थ्यांच नुकसान होऊ नये अशी मागणी केली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या परिक्षावर बहिष्कार घातला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत काम करत असलेल्या 750 शिक्षकांनी यापूर्वी माहिती देताना,सहा मागण्या केल्या होत्या.



या आहेत सहा मागण्या: सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे शासन निर्णय पुनर्जिवित करून पूर्ववत लागू करा. सातव्या वेतन आयोगानुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना कर्मचाऱ्यांना लागू करा. सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या एक हजार ४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ द्या. विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनचा वेतनातील फरक द्यावा. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या; जुनी पेन्शन योजना लागू करा. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी द्या.



परीक्षेसाठी आलेले हजारो विद्यार्थी माघारी :सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी महाविद्यालयात दाखल झाले होते.महाविद्यालयात परिक्षेसाठी ड्युटी वर असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार घातल्याने महाविद्यालय प्रशासनाने परीक्षा रद्द झाल्याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली.सत्र परिक्षेसाठी दाखल झालेले हजारो विद्यार्थी माघारी गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांच नुकसान न होण्याची मागणी:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील वालचंद आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालयासमोर घोषणाबाजी केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे राज्यातील इतर विद्यापीठापेक्षा मागे आहे.शिक्षेतर कर्मचारी व राज्य शासन यांच्यात तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांच नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांची ही कुचंबणा थांबवावी अशी मागणी करत, महाविद्यालया बाहेर घोषणाबाजी केली.

हेही वाचा:Virat Mahamuk Morcha ख्रिस्ती समाजाचा विराट महामूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने ख्रिस्ती बांधव रस्त्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details