महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उजनी परिसरात 100 मिलिमीटर पावसाची नोंद, भीमा नदीत 16 हजार 600 क्सुसेकने विसर्ग

उजनी धरण परिसरात चांगला पाऊस झाला असून दौंड येथून 6 हजार तर बंडगार्ड येथून 7 हजार विसर्ग येत आहे. धरण 111 टक्के भरले आहे. तर धरणात 200 हून अधिक टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे उजनी धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले होते. भीमा नदीत एकूण 16 हजार 600 क्‍युसेक विसर्ग करण्यात आला.

solapur ujani dam overflow
उजनी परिसरात रात्रीत 100 मिलिमीटर पावसाची नोंद, भीमा नदीत 16 हजार 600 क्सुसेकने विसर्ग सुरू

By

Published : Sep 8, 2020, 10:49 AM IST

पंढरपूर - उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. धरण परिसरात 100 मिलिमीटर इतका पाऊस झाला. त्यामुळे उजनी धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले . भीमा नदीत एकूण 16 हजार 600 क्‍युसेक विसर्ग सुरू होता. सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत 13 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नरसिंग येथे निरा आणि भिमा नदीच्या संगमावर 23 हजार क्यूसेक विसर्ग आल्यामुळे भीमा नदी काठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उजनी धरणाचे दृश्य...

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. रविवारी रात्री मेघगर्जनेसह सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे उजनीत येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 6 हजार तर बंडगार्ड येथून 7 हजार विसर्ग येत आहे. धरण 111 टक्के भरले आहे. तर धरणात 200 हून अधिक टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पंढरपूर तालुक्‍यालाही रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. पंढरपूर शहरातही मुसळधार पाऊस झाला.

तब्बल 15 ते 20 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने रविवारपासून जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. रविवारी पंढरपुर तालुक्यात दमदार पाऊस बरसला. तर सांगोला, माळशिरास तालुक्यात वादळ व वीज गर्जनांसह मूसळधार पाऊस बरसला. पंढरपूर शहरात मुसळधार पाऊस बरसल्याने उपजिल्हा रूग्णालयाच्या मार्गावर पाणी साचले होते. त्यामुळे या मार्गावर अनेकांच्या दुचाकी बंद पडल्या. रस्त्यावरील पाणी काही घरांमध्येही शिरले. तर मंगळवेढा तालुक्यातील काही गावात वादळासह मुसळधार पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाली होती. रस्त्यावर प्रचंड पाणीही साचले होते.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे ऊस, ज्वारी, द्राक्ष पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर गेल्या दहा ते वीस दिवसापासून कडक उन्हामुळे उकाड्यामुळे नागरिक हैरान झाले होते. मात्र जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना जीवदान आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

उजनी धरणातील पाणी पातळी -
एकूण पाणीपातळी - ४९७.२७०० मीटर
एकूण पाणीसाठा - ३४७०.३१ दलघमी
उपयुक्त साठा - १६६७.५० दलघमी
टक्केवारी - १०९.९१ टक्के
आवक
दौंड विसर्ग - ४,९०५ क्यूसेक
बंडगार्डन - ५,४३८ क्यूसेक
विसर्ग
कालवा - २,६०० क्युसेक
बोगदा - १,००० क्युसेक
वीज निर्मिती - १,६०० क्युसेक
नदी विसर्ग - १५,००० क्युसेक

ABOUT THE AUTHOR

...view details