महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पगाराबाबत तोडगा काढा; अन्यथा काम बंद, परिवहन कर्मचाऱ्यांचा महापालिकेला इशारा - salary

परिवहन कर्मचारी देविदास गायकवाड यांच्यावर दाखल असलेला खोटा गुन्हा मागे घेऊन त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई थांबली नाही, तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रहार संघटनेच्यावतीने महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे यांना देण्यात आला

परिवहन कर्मचाऱ्यांचा महापालिकेला इशारा

By

Published : Apr 26, 2019, 3:32 PM IST

सोलापूर - परिवहन कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा थकीत पगार मिळाला नाही तर १ मे पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. परिवहन कर्मचाऱ्यांचा मागील तीन महिन्यांचा थकीत पगार अदा करून कामगारांची होणारी उपासमार थांबवण्यात यावी, अन्यथा ५ दिवसानंतर पुन्हा एकदा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून महापालिका प्रशासनास निवेदनाद्वारे देण्यात आला.

परिवहन कर्मचारी देविदास गायकवाड यांच्यावर दाखल असलेला खोटा गुन्हा मागे घेऊन त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई थांबली नाही, तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रहार संघटनेच्यावतीने महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे यांना देण्यात आला. महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या परिवहन विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार मिळाला नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वारंवार परिवहन कर्मचारी संघटनेच्यावतीने अधिकाऱ्यांना पगारासाठी विचारपूस करण्यात येत असून अधिकाऱ्यांकडून कामगारांना दमदाटी करून गुन्हे दाखल करण्याची नवी प्रथा परिवहन विभागात सुरू झाल्याने कामगार नाराज आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

परिवहन कर्मचाऱ्यांचा महापालिकेला इशारा


परिवहन विभागात चालक असलेले देविदास गायकवाड यांनी सातत्याने अधिकाऱ्यांकडे पगारासाठी पाठपुरावा केल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर २३ एप्रिलला सदर बाजार पोलीस ठाणे येथे शासकीय कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला. गायकवाड सात रस्ता डेपो येथून बसने जात असताना परिवहन व्यवस्थापकाच्या ईनोवा गाडी चालकांनी दमदाटी करत शिवीगाळ करून गच्ची धरून त्यांना मारहाण केली आणि उलट गायकवाड यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याने परिवहन कर्मचाऱ्यांनी या सर्व घटनेचा निषेध केलेला आहे. येत्या ५ दिवसात ३ महिन्यांचा पगार आणि देविदास गायकवाड यांच्यावर दाखल असलेला खोटा गुन्हा मागे घेऊन त्यांच्यावर निलंबनाची केलेली कारवाई मागे घेण्यात यावी अन्यथा पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त तावरे यांना प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले .

ABOUT THE AUTHOR

...view details