सोलापूर- अक्कलकोट शहरातील माणिकपेठ येथील एका खासगी घरात ग्रामीण पोलीस दलातील विशेष पथकाने छापा टाकला आहे. यामध्ये जुगार खेळणाऱ्या २४ जणांना अटक करण्यात आली. तसेच या कारवाईमध्ये तब्बल साडे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये 7 लाख 53 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अक्कलकोटमध्ये खासगी घरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २४ जुगारी ताब्यात - अक्कलकोट ग्रामीण पोलीस कारवाई
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने अक्कलकोट येथील जुगार अड्ड्यावर छापेमारी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २४ जणांना ताब्यात घेतले आहे. तर जवळपास ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करताना एसपी यांच्या विशेष पथकाला माहिती मिळाली होती की, अक्कलकोट शहरातील माणिकपेठ येथील एका खासगी खोलीमध्ये काही लोक मन्ना नावाचा जुगार खेळत आहेत. त्यानुसार गुप्त बातमीदारामार्फत अधिकची माहिती घेऊन त्या खासगी घरावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत 24 जण जुगार खेळताना दिसून आले. त्यांच्याकडून 09 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच जुगार खेळणाऱ्या सर्व आरोपींसह जप्त करण्यात आलेली वाहने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबत कारवाईची मोहीमच उघडली आहे. त्यामुळे अशा प्रकारेच जुगार, दारू विक्रीकरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.