महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनावर मात करण्यासाठी सोलापूर पोलीस राबविणार विशेष मोहीम

कोराना विषाणूच्या भीती पोटी जवळपास अडीच महिने संपूर्ण देशात लॉकडाऊन होते. हा संसर्गजन्य आजार संपूर्ण जगासाठी नवीन असल्यामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. जवळपास अडीच महिन्यानंतर आता बाजारपेठ सुरू झाली आहे. आता एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे सर्व गोष्टी सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा पाठलाग करून त्यावर नियंत्रण मिळविण्याची ही वेळ आहे. त्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आराखडा तयार केला असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

manoj patil (sp, solapur rural)
मनोज पाटील (पोलीस अधीक्षक, जिल्हा ग्रामीण पोलीस)

By

Published : Jun 8, 2020, 8:05 PM IST

सोलापूर - पुढील काळात जिल्ह्यात 'कोरोनाचा पाठलाग' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सध्या या मोहिमेची सुरुवातही करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी यासाठी प्रयत्न करून आराखडा तयार केला आहे. कोरोनाचा पाठलाग या पध्दतीने काम केल्यावर कोरोना रोखण्यात यश येत असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

मनोज पाटील (पोलीस अधीक्षक, जिल्हा ग्रामीण पोलीस)

कोराना विषाणूच्या भीती पोटी जवळपास अडीच महिने संपूर्ण देशात लॉकडाऊन होते. हा संसर्गजन्य आजार संपूर्ण जगासाठी नवीन असल्यामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. देशात कोरोनामुळे अनेकांचे खूप मोठे हाल झाले होते. जवळपास अडीच महिन्यानंतर आता बाजारपेठ सुरू झाली आहे. आता एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे सर्व गोष्टी सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा पाठलाग करून त्यावर नियंत्रण मिळविण्याची ही वेळ आहे. त्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आराखडा तयार केला असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

सुरुवातीच्या काळात कोणाला घेऊन आपण घरात बसलो होतो? कोरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये या आजारासंदर्भात अनेक गोष्टींची कोणतीच कल्पना नसल्यामुळे घरात बसून राहण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. मात्र, जवळपास अडीच महिन्यानंतर अनेक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळे आता कोणाला न भिता त्याचा पाठलाग करून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या 100 च्या आत आहे. यातील जवळपास 50 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

मागील दोन महिन्याचा अनुभव लक्षात घेता कोरोना बधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कधी ताब्यात घ्यायचे? त्याचा स्वॅब कधी घ्यायचा? याबद्दल नव्याने पद्धत स्विकारण्यात आली आहे. आतापर्यंत पोलीस, आरोग्य, महसूल या यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होत्या. मात्र, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तयार करण्यात आलेल्या या आराखड्यानुसार कोरोना बाधित आणि त्यामुळे होणारे बाधित यांना तत्काळ ओळखता येत आहे. आरोग्य यंत्रणेची बारीकसारीक माहिती पोलीस घेऊ लागले आहेत. तर पोलीस आणि महसूल विभागाची माहिती हे आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी घेत आहेत. त्यामुळे काम चांगल्या पद्धतीने होत असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details