महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध वाळू व्यवसाय करणारा 'तो' पोलीस नाईक अखेर बडतर्फ! - पोलीस नाईक विकी गायकवाड लेटेस्ट न्यूज

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहरात बेकायदेशीर वाळू वाहतूक केली जात होती. यामध्ये अनेकांनी अफाट संपत्ती जमवली असल्याचे समोर आले आहे. या बेकायदेशीर वाळू तस्करीच्या धंद्या१ला आळा घालण्याऐवजी पोलीस नाईक विकी सुभाष गायकवाड याने आसरा दिला, अशी चर्चा रंगली.

solapur police naik who trades an illegal sand is dismiss
अवैध वाळू व्यवसाय करणारा 'तो' पोलीस नाईक अखेर बडतर्फ!

By

Published : Sep 3, 2020, 1:34 AM IST

सोलापूर -''वाळूच्या गाड्या सोडा, त्या माझ्या भागीदारीमधील आहेत, मी पोलीस आहे, माझ्यावर गुन्हा दाखल करणार का?'', असे प्रश्न पोलीस निरीक्षकांना विचारणाऱ्या पोलीस नाईक विकी गायकवाडला पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बडतर्फ केले आहे. विकी गायकवाडचे यापूर्वीही निलंबन करत पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही असा आदेशही देण्यात आला होता. शिवाय, दिवसातून दोनदा पोलीस मुख्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करत पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली होती. मात्र, बुधवारी सायंकाळी त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

पोलीस नाईक विकी गायकवाड

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहरात बेकायदेशीर वाळू वाहतूक केली जात होती. यामध्ये अनेकांनी अफाट संपत्ती जमवली असल्याचे समोर आले आहे. या बेकायदेशीर वाळू तस्करीच्या धंद्या१ला आळा घालण्याऐवजी पोलीस नाईक विकी सुभाष गायकवाड याने आसरा दिला, अशी चर्चा रंगली. पोलीस आयुक्त शिंदे यांनी १४ ऑगस्ट रोजी विकी गायकवाडला वाळू प्रकरणात निलंबित केले असल्याचे आदेश काढले होते. २ सप्टेंबर रोजी बुधवारी सायंकाळी आयुक्तांनी नव्याने बडतर्फीचे आदेश दिले आहेत.

विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ऑगस्ट रोजी सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे हे रात्र गस्त घालत होते. सोरेगाव ते शमशादपूर या मार्गावर पहाटेच्या सुमारास वाळूने भरलेली दोन वाहने डीबी पथकाच्या पोलिसांनी पकडली. त्यावेळी वाळू वाहतूक करणारे वाहनचालक रवी प्रकाश निकम (रा.जय बजरंग नगर, सोलापूर) व पंकज दत्तात्रय जाधव (रा.सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) यांनी ही वाहने पोलीस नाईक विकी गायकवाडची असल्याचे सांगितले. अमित शेटे यांनी वाळूची दोन्ही वाहने विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणून लावली. ४ ऑगस्टला विकी गायकवाड विजापूर नाका पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकासोबत अरेरावीची भाषा वापरली. मुख्यालयात खात्यांर्गत चौकशी केल्यानंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई झाली आहे.

चौकशी अंतर्गत समोर आलेले मुद्दे -

  • ८ ऑगस्ट २०२० रोजी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे वाळू वाहतूकीचा(गौण खनिज चोरी) गुन्हा दाखल होता.
  • २०१४ मध्ये विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जडवाहतुक बंदी असताना वाळूचे ट्रक सोडवण्यासाठी एका वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून, अरेरावीची भाषा वापरली.
  • २०१२-१३ मध्ये विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आयटीआय पोलीस चौकी जवळ एका पोलीस उपनिरीक्षक सोबत वाळुचे ट्रक सोडवण्यासाठी अरेरावीची भाषा वापरत उद्धट वर्तन केले.

    विकी गायकवाडची खात्यांर्गत झालेल्या चौकशीमध्ये हे मुद्दे समोर आले आहे.पोलीस असून पोलीस कारवाई वेळी पोलिसांसोबत असभ्य वर्तन, उद्धट व बेजबाबदार वर्तन केले असल्याने त्याला सेवेतून बडतर्फ करत असल्याचा आदेश पारित झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details