महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शब-ए-बारात' च्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांचा स्मशानभूमीला कडेकोट पहारा - मुस्लिम कब्रस्तानात

'शब-ए-बारात' निमित्त शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने कब्रस्तान येथे मृत झालेल्या आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जातात. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी  होत असते. ही गर्दी होता कामा नये, म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

सोलापूर पोलीस
सोलापूर पोलीस

By

Published : Mar 28, 2021, 10:02 PM IST

सोलापूर - वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे सोलापूर शहरात देखील कडक नियम लागू केले आहे. सोलापुरातील जिल्हा प्रशासनाने आणि मनपा प्रशासनाने जिल्ह्यात व शहरात विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच सार्वजनिकरित्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांवर कडक निर्बंध लागू केले आहे. होळी, धुळवड, रंगपंचमी सार्वजनिक साजरे करण्यास सोलापूरात बंदी आहे. तसेच मुस्लिम समाजात साजरा होणाऱ्या 'शब-ए-बारात' वर देखील कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. सोलापूर शहर पोलिसांनी शहरातील सर्व मुस्लिम कब्रस्तानमध्ये कडेकोट बंदोबस्त लावला आहे. कब्रस्तानमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना मनाई करण्यात आली आहे. फक्त अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या 20 नागरिकांना प्रवेश दिला जात आहे.

शहरातील मुस्लिम कब्रस्तानात कडेकोट पोलीस बंदोबस्त
'शब-ए-बारात' निमित्त शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने कब्रस्तान येथे मृत झालेल्या आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जातात. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ही गर्दी होता कामा नये, म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. शहरात जडेसाब मुस्लिम कब्रस्तान, मोदी, आणि चिराग अली तकीया या कब्रस्तानाच्या मुख्य प्रवेशद्वारवरच पोलिसांनी बॅरिकेडस् लावले आहे.

माहिती देतांना पोलीस

सोलापुरात रविवारी आढळले 601 कोरोनाचे रुग्ण
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज (रविवारी) 601 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ग्रामीण भागात 391 रुग्ण तर शहरात 210 रुग्ण आढळले आहेत. शहर व जिल्ह्यात 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-राज्यात कोरोना स्थिती गंभीर.. लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details