सोलापूर- तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवलेली एक पंधरा वर्षांची मुलगी. अनोळखी शहरात वाट चुकली. तिचा गरीब भटक्या आई-बापांशी संपर्क तुटलेला असताना सोलापूर शहर पोलिसांच्या सतर्कता आणि माणुसकीमुळे कम्युनिटी पोलिसिंगचा नवा अध्याय अनुभवायला मिळाला. हैदराबाद आणि उन्नावसारख्या सामाजिक विकृतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात निर्भया नाही तर एका सुरक्षित गुडियाची कहाणी पाहायला मिळाली.
मध्य प्रदेशातील गऱ्हाकोटा येथील रंगा मल्होत्रा आणि त्याची पत्नी एटणी हे गरिब दाम्पत्य साडी विकण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. जिथे जागा मिळेल तिथे त्यांचे घर असायचे आणि त्याच परिसरात फिरस्ती साडी विक्रीचा त्यांचा व्यवसाय करत होते. या व्यवसायाच्या निमित्ताने आई-वडील उमरगा येथे फिरतीवर गेल्यावर त्यांची 15 वर्षांची मुलगी आजीबरोबर तुळजापूरला गेली आणि भर दुपारी वाट चुकली. आई-वडिलांच्या शोधात ती सोलापुरात पोहोचली. वाट मिळेल तिकडे ती फिरत होती. तिच्यासाठी शहर आणि शहरातील माणसेसुद्धा नवीन होती. दिवस मावळतीला गेल्यावर ती जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुपाभवानी मंदिर परिसरात फिरत असताना पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्या गुडीयाला रडू फुटले. तिने आपण भरकटल्याचे सांगितले.
हेही वाचा - सोलापुरात 'या' ठिकाणी दररोज भरते कावळ्यांची जत्रा, प्रेमाचा घास भरवितात 'कावळे मामा'