महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

The Kashmir Files Viral Video : 'द काश्मीर फाईल्स' बघून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या दोघांना सोलापूर पोलिसांनी केली अटक - कश्मिर फाईल व्हायरल व्हिडीओ

'द कश्मीर फाइल्स' ( The Kashmir Files ) हा चित्रपट संपूर्ण भारतात चर्चेचा विषय झाला आहे. त्याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल ( Solapur Kashmir File Viral Video ) झाल्याने सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. पण एमआयडीसी पोलिसांनी ताबडतोब व्हिडीओमधील दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

The Kashmir Files Viral Video
The Kashmir Files Viral Video

By

Published : Apr 2, 2022, 7:28 PM IST

सोलापूर -'द कश्मीर फाइल्स' ( The Kashmir Files ) हा चित्रपट संपूर्ण भारतात चर्चेचा विषय झाला आहे. त्या चित्रपटातील विषयावरून वेगवेगळी मतांतरे समोर येत आहेत. सोलापुरात एका संघटनेच्यावतीने महिला व युवकांना हा चित्रपट दाखवण्यात आला होता. चित्रपट पाहून झाल्यानंतर काही समाजकंटकांनी महिला व मुली व तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल ( Solapur Kashmir File Viral Video ) झाल्याने सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. ऐन गुडी पाडव्याला हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने पोलीस प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाला होता. पण एमआयडीसी पोलिसांनी ताबडतोब व्हिडीओमधील दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत डीसीपी डॉ वैशाली कडुकर यांनी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रतिक्रिया

चित्रपट पहिल्यानंतर माथी भडकवण्याचा प्रयत्न -एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चित्रपट गृहात काही व्यक्तींनी महिलांना, मुलींना व तरुणांना चिथावणीखोर भाषण करून दुसऱ्या समाजबाबत भडकवण्याचा प्रयत्न केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताच सोलापुरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काही समाजसेवकांनी ताबडतोब निवेदन प्रत तयार करून पोलीस आयुक्त कार्यालय गाठले आणि संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी केली. डीसीपी डॉ. वैशाली कडूकर यांनी देखील याची गंभीर दखल घेत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

दोन संशयीत ताब्यात -ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याबाबत सोलापूर शहर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने याची सविस्तर माहिती घेत, एमआयडीसी पोलिसांना सर्व माहिती दिली होती. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी व्हिडीओमधील दोन संशयीताना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आदेशानुसार यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहे.

हेही वाचा -Mumbai Metro New Lines : मुंबईत दोन नव्या मेट्रो लाईन्सचे उद्घाटन.. मुख्यमंत्री ठाकरेंनी दाखवला हिरवा झेंडा

ABOUT THE AUTHOR

...view details