सोलापूर:सोलापूर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची भाषण करताना जीभ घसरली आहे. मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच प्रचार शिगेला पोहोचला आहे. भीमा साखर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार असून प्रचार करताना,भाषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जात आहेत. मोहोळ तालुक्यात एका सभेत भाषण करताना, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. विरोधक आमच्या पोरांना बाळ म्हणत्यात. यांना माहिती आहे का, पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच तुमच्या एवढी बाळ असत्यात, असे वादग्रस्त विधान राजन पाटील यांनी केले आहे.
Rajan Patil Controversial Statement: पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच... राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घसरली जीभ !
Rajan Patil Controversial Statement: पाटलांचा नाद नाय करायचा, भीमाच्या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घसरली जीभ
भीमाच्या निवडणुकीच्या प्रचारात राजन पाटलांचे वक्तव्य:राजन पाटील यांना सोलापुरातील राष्ट्रवादीचा हुकमी एक्का म्हणून पाहिले जाते. सोलापूरच्या ग्रामीण राजकारणात राजन पाटील यांचा मोठा दबदबा आहे. राजन पाटील यांची बाळराजे राजन पाटील व विक्रांतराजे राजन पाटील अशी दोन मुलं सोलापूरच्या राजकारणात सक्रिय होत आहेत. 1980 पासून मोहोळ तालुक्यातील अनगर या गावातून राजन पाटील घराण्याचा राजकारण सुरू झाला आहे. सिकंदर टाकळी या गावातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित राजन पाटील यांची मुलं प्रचार करत आहेत.
पाटलांच्या बाळांना लग्ना आधी तुमच्या एवढी बाळ:मोहोळ तालुक्यातील नरखेड या गावातील राष्ट्रवादीचेच प्रवक्ते उमेश पाटील यांनी भाजपच्या प्रशांत परिचारकांना बळ दिले आहे. भीमाची सहकारी साखर कारखान्याची सत्ता खेचून आणण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी राजन पाटलांच्या मुलाला विरोधकांनी बाळ असे म्हटले होते. त्यावर राजन पाटील एका सभेत उत्तर देताना यांची जीभ घसरली आहे. पाटलांच्या पोरांना बाळ म्हटलं जातंय, तर पाटलांच्या पोरांना लग्ना आधी तुमच्या एवढी बाळ असतात. वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलम भोगणारी पोर आहेत. असे वक्तव्य माजी आमदार राजन पाटील यांनी केले आहे.