महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहिता लागू; सोलापूरच्या महापौर बनशेट्टींनी रस्त्यातच सोडली शासकीय गाडी - लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर तत्काळ सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी महापालिकेची गाडी प्रवासादरम्यान अर्ध्यावर सोडली. यानंतर त्या ऑटोने घरी गेल्या.

महापौर शोभा बनशेट्टी

By

Published : Mar 10, 2019, 8:57 PM IST

सोलापूर - लोकसभा निवडणुकीची आज आचारसंहिता लागू झाली. यानंतर आचारसंहितेची तत्काळ अंमलबजावणी सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी केल्याचे दिसून आले. आचारसंहिता जाहीर झाल्याचे समजल्यानंतर बनशेट्टी यांनी महापालिकेची गाडी प्रवासादरम्यान अर्ध्यावर सोडली. यानंतर त्या ऑटोने घरी गेल्या.

महापौर शोभा बनशेट्टी

निवडणूक आयोगाने आज लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तत्काळ आचारसंहिता देखील लागू करण्यात आली. यामुळे बनशेट्टी यांनी त्या वापरत असलेल्या महापालिकेची शासकीय गाडी शहरात रस्त्यावरच सोडून दिली. त्यानंतर चालक ती गाडी घेऊन पालिकेकडे निघून गेला. तर बनशेट्टी ऑटोरिक्षामध्ये बसून घराकडे गेल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details