सोलापूर: गुजरात रबर फॅक्टरी ही मूळची गुजरात राज्यातील आहे. देशभरात यांच्या विविध जिल्ह्यात शाखा आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर गुजरात रबर फॅक्टरीचे रबर प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक दुचाकी व चार चाकी वाहन कंपन्याच्या टायरसाठी गुजरात रबर फॅक्टरी रबर निर्यात करते. अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये लागलेल्या आगीचे जवळपास 5 किलोमीटरवर धुराचे लोण दिसत होते.अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील रबर फॅक्टरीला आग लागल्यानंतर आसपासच्या गारमेंट कारखान्यांनाही आगीने घेरले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहापर्यंत धुमसत होती. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. प्राथमिक माहितीनुसार आगीत जीवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
50 गाड्यांने पाणी फवारले: सोलापूर महापालिका, तसेच एमआयडीसी, एनटीपिसी, अक्कलकोट शहर, बार्शी येथून 50 अग्नीशमन दलाच्या गाड्या पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही. परिसरातील इतर कारखानदार हवालदिल झाले आहेत. मिळेल ते साहित्य हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मनपाचे अग्निशमन दल अधिकारी केदार आवटे यांच्यां सह, २५ जणांची टीम आग नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय झाली होती. तर सोलापूर शहर पोलीस फौज फाटा तळ ठोकून आहे. आगीत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली अशी प्राथमिक माहिती समोर आहे. तर गुजरात रबर फॅक्टरी मध्ये सोलापुर शहरातील युनिटमध्ये शेकडो कर्मचारी काम करतात. मूळची गुजरात राज्यातील ही कंपनी ,देशभरात अनेक ठिकाणी याचे युनिट कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले दुचाकी व चार चाकी वाहन कंपन्यासाठी गुजरात रबर फॅक्टरीमधून उच्च दर्जाचे टायरचे रबर निर्यात केले जाते.