सोलापूर - शहरातील स्थानिक तरुण हे पोलिसांना त्यांच्या कामात मदत करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्यासाठी पोलिसांनी स्थानिक तरुणांना पोलीस अधिकारी म्हणून नियूक्त केले आहे. हे स्थानिक तरुण पोलिसांना त्यांच्या कामात मदत करणार आहेत. या तरुणांना प्रशिक्षण देऊन रस्त्यावर सुरक्षेसाठी उभे करण्यात येणार आहे.
स्थानिक तरुणांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांचे पोलिसांना सहकार्य - सोलापूर विशेष पोलीस अधिकारी
सोलापूर शहरात ३ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करावी लागली. आता पुन्हा लोक बाहेर पडू नये यासाठी स्थानिक तरुणांना पोलिसांनी सोबतीला घेतले आहे. राष्ट्रीय कार्य करण्यास इच्छा असणाऱ्या तरुणांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र, रस्त्यावर नागरिक गर्दी करत होते. त्यामुळे शहरात ३ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करावी लागली. आता पुन्हा लोक बाहेर पडू नये यासाठी स्थानिक तरुणांना पोलिसांनी सोबतीला घेतले आहे. राष्ट्रीय कार्य करण्यास इच्छा असणाऱ्या तरुणांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 30 तरुणांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे 30 तरुण आजपासून पोलिसांसोबत कर्तव्य बजावणार आहेत. त्यांना कर्तव्य बजावत असताना नेमके काय करावे? याचे प्रशिक्षण बुधवारी रात्री देण्यात आले. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी या तरुणांना मार्गदर्शन केले.