सोलापूर -विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे. सकाळी 8 ते 12 या कालावधीत पदवीधरांसाठी 20.72 टक्के तर शिक्षक मतदार संघात 35.36 टक्के मतदान झाले आहे. यादरम्यान, शहरातील मतदार केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.
पदवीधर मतदान -
पदवीधर मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण 123 मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीत 42 हजार 70 पुरुष, तर 11 हजार 742 स्त्री मतदारांची संख्या आहे. सकाळी 8 ते 10 कालावधीत 9 हजार 473 पदवीधर पुरुषांनी तर 1679 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघात दुपारी 12 पर्यंत 20.72 टक्के मतदान झाले आहे.