सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक वाढतच चालला आहे. शहरात आज गुरुवारी दिवसभरात 356 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ग्रामीण भागात 717 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 30 बाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी घडल्याने प्रशासन हादरले आहे.
सोलापुरात एकाच दिवशी 30 कोरोना बधितांचा मृत्यू ;1 हजार 73 रुग्णांची भर - today corona situation in solapur
सोलापूर शहरात दिवसभरात 356 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 206 पुरुष तर 150 स्त्रिया आहेत. 14 बाधित रुग्णांचा कोरोना आजाराने बळी घेतला आहे. मृतांमध्ये 10 पुरुष आणि 4 स्त्रिया आहेत. सोलापुर शहरात सद्यस्थितीत 3 हजार 565 अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रतिकात्मक फोटो
सोलापूर शहरात दिवसभरात 356 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 206 पुरुष तर 150 स्त्रिया आहेत. 14 बाधित रुग्णांचा कोरोना आजाराने बळी घेतला आहे. मृतांमध्ये 10 पुरुष आणि 4 स्त्रिया आहेत. सोलापुर शहरात सद्यस्थितीत 3 हजार 565 अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच दिवसभरात 16 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्य झालेल्या रुग्णांत 10 पुरुष आणि 6 स्त्रिया आहेत. सर्वाधिक बाधित रुग्ण पंढरपूर, माळशिरस, बार्शी, करमाळा आणि माढा येथे आढळले आहेत.