महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीक कर्ज द्या..! अन्यथा तक्रार दाखल करु; कर्ज न देणाऱ्या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक बँकेस पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे, पण बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शासकीय नियमानुसार पीक कर्ज वितरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुध्द पोलीस तक्रार करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तक्रार नोंदवण्याची कारवाई केली जाईल

district collector
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

By

Published : Jul 2, 2020, 6:32 AM IST

Updated : Jul 2, 2020, 11:32 AM IST

सोलापूर- पीक कर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न करणाऱ्या बँकांविरुध्द पोलिसांकडे तक्रार केली जाणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक बँकेस पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे, पण बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शासकीय नियमानुसार पीक कर्ज वितरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुध्द पोलीस तक्रार करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तक्रार नोंदवण्याची कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केलंय.

पीक कर्ज द्या..! अन्यथा तक्रार दाखल करु

याबाबत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सांगितले, की खरीप हंगाम सुरू होऊन सुमारे एक महिना झाला आहे. सोलापूर जिल्ह्यास एकूण 1438.52 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. 30 जूनअखेर 648.88 कोटी पीक कर्जाचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 30 जून अखेर पीक कर्ज वाटपात वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 45 टक्केच वाटप झाले आहे. हे वाटप जास्तीत जास्त व्हावे, यासाठी बँकाकडे पाठपुरावा केला जात आहे. याबाबत उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्राद्वारे सूचना दिली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र,स्टेट बँक ऑफ इंडिया यासह कांही प्रमुख बँकांचा समावेश आहे.त्याचवेळी आयसीआयसीआय बँकेने 166.26 टक्के तर एचडीएफसी बँकेने 99.46 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

Last Updated : Jul 2, 2020, 11:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details