सोलापूर- जिल्ह्यात भाजप 4 जागांवर, राष्ट्रवादी 3 जागांवर, अपक्ष 2 जागांवर दोन ठिकाणी अपक्ष तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले.
सोलापूर जिल्हा : महायुती 5, आघाडी 4 तर अपक्ष 2 जागांवर विजयी
जिल्ह्यात भाजप 4 जागांवर, राष्ट्रवादी 3 जागांवर, अपक्ष 2 जागांवर दोन ठिकाणी अपक्ष तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले.
सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघापैकी भाजपला 4 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीने तीन ठिकाणी विजय मिळविला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या संजय शिंदे यांनी देखील करमाळ्यातून विजय मिळविला आहे.
शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातील 6 जागेवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त सांगोला या एकाच जागेवर शिवसेनेला विजय मिळवता आला आहे. तर काँग्रेसला देखील सोलापूर शहर मध्य या ठिकाणी एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. मागील वेळी सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे तीन आमदार होते. यावेळी फक्त प्रणिती शिंदे या एकट्याच विजयी झाल्या आहेत.
- सोलापूर जिल्ह्यातील विजयी उमेदवार
- सोलापूर शहर उत्तर - पालकमंत्री विजय देशमुख (भाजप)
- सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
- सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख (भाजप)
- अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी (भाजप)
- मोहोळ - यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस)
- माळशिरस - राम सातपुते (भाजप)
- बार्शी -राजेंद्र राऊत (अपक्ष)
- माढा : बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- पंढरपूर - भारत भालके (राष्ट्रवादी काँग्रेस)
- करमाळा - संजय शिंदे (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष)
- सांगोला - शहाजी पाटील (शिवसेना)