ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डिसले गुरुजींच्या उपक्रमाला जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करणार- पालकमंत्री दत्ता भरणे - solapur ranjeet disley news

ग्लोबल टीचर अवॉर्ड बार्शी येथील रणजितसिंह महादेव डीसले यांना जाहीर झाला आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पालकमंत्री दत्ता भरणे यांनी डीसले यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाप्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.

district-administration-will-help-ranjeet-disley-in-solapur
डीसले गुरुजींच्या उपक्रमाला जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करणार- दत्ता भरणे
author img

By

Published : Dec 4, 2020, 6:36 PM IST

सोलापूर- युनेस्कोने व लंडन येथील वारकी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर अवॉर्ड बार्शी येथील रणजितसिंह महादेव डिसले यांना जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला नोबल प्रति पुरस्कार जाहीर झाल्याने सोलापूरचे नाव जागतिक पातळीवर झळकले आहे. आज शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी डिसले यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.

दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया

जिल्हा परिषद शिक्षकाला जागतिक पुरस्कार -

बार्शी येथील एका सर्वसाधारण शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपले प्रयोग सुरू ठेवत 'क्यू-आर कोड' पद्धतीचा आरंभ केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता 'क्यू-आर कोड'मधून ऑनलाइन शिक्षण मिळेल.

जिल्हा प्रशासन सर्व तोपरी मदत करणार -

जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने सोलापूर जिल्हा परिषदेचे नाव जागतिक पातळीवर झळकवले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनाची मान उंचावली आहे. यांच्या पुढील प्रयोगासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे.

शुभेच्छांचा वर्षाव -

गुरुवारी लंडन येथील एका कार्यक्रमात डीसले गुरुजींच्या नावाची घोषणा होताच रणजित डीसले यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांच्या रांगा लागल्या आहेत. आज शुक्रवारी दिवसभर जिल्हा प्रशासनातील मोठे अधिकारी आणि राजकीय नेते यांनी देखील कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

हेही वाचा - सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीवर असे होतेय काम

ABOUT THE AUTHOR

...view details